निरोपाचा दिवस........!
जातानाही कशाला मागे पाहतात
का डोळ्यातील आसवांना सांडतात
शेवटी सगळे सोडतात हे जग
हातातील हात निसटतात मग
कशाला मग ह्र्दय गुंतवायचे
डोळ्यांना डोळे असे भिडवायचे.......!
अचानक माणसे माणसाला भेटतात
दोन ह्र्दय प्रेमाने एकरूप होतात
प्रेम बंधनात मग अडकून पडतात
मागे फिरताना मग पाय अडखळतात....!
पण मनाचे डोळे ऐकत नाही
ह्रदयाचे पाणी मग थांबत नाही
काळजाचे ठोके धड धडू लागतात
पापण्यावर थेंब जमू लागतात
जवळच्याला सोडून जाता येत नाही
लांब जाऊन मन मात्र रमत नाही
निरोपाचा दिवस असा सरणारा
ह्रदयाला घायाळ करणारा ........!
-- बिपीन जगताप
Social Plugin