देव भेटला...!

अवघा देश रंगला
आज देव भेटला
भगवा रंग भरला
संगे विठू चालला
माझा आहे देव भोळा
सारा गोपाळांचा मेळा
गंध लावू या कपाळी
देऊ देवाला आरोळी
घेऊ हातात हे हात
पेटवू ज्ञानाची वात
करू अंधारावर मात
जीवन गाणे हे गात
विठ्ठल बघा तो आला
माउलीच्या पालखीला
कसा जीव शांत झाला
आत्मा परमात्मा मिळाला
- बिपीन जगताप
Social Plugin