थेंब टिपताना ...!
थेंब थेंब टिपताना रान गेले शहारून
आला आला श्रावण काळ्या ओल्या ढगातून
सरीवर सरी आल्या भरलेल्या आभाळातून
थंडगार वारा पहा झोके घेत वाहताना
पावसाचे गाणे मला सुचू लागले गाताना
कोवळी गर्द हिरवळ हलू लागे पाहताना
टप टप पाणी वाजे घराकडे जाताना
गेल्या साऱ्या वेली भिजून आभाळातील पाण्याने
डराव डराव वातावरण झाले बेडकाच्या गाण्याने
सारे जण वेडे झाले पडलेल्या पावसाने
आनंदाचे गाणे झाले तुषार झेलाण्याने
- बिपीन जगताप
Social Plugin