धबधबा कोसळू लागला ...!
पांढऱ्या मोत्यांचा हार झाला
हिरव्या शालूवर उठून दिसला
गार वारा सुसाट धावू लागला
धबधबा जोराने कोसळू लागला
शांतपणा कोठे हरवून गेला
मस्ती करण्याचा दिस उगवला
चारी बाजूनी पाणी पळत आले
शुभ्र पाण्याचे पात्र मोठे झाले
आजूबाजूला दव बिंदू पडले
पाणी खडकावर आदळू लागले
वर खाली झेपावत चालले
गर्द हिरवळीवर उठून दिसले
निसर्गाचा आहे अजब चमत्कार
माणसाने करावा फक्त नमस्कार
-- बिपीन जगताप
Social Plugin