Type Here to Get Search Results !

"Symbol of Knowledge"' डॉ बाबासाहेब आंबेडकर

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर यांची आज १२६ वी जयंती आहे !!

Image may contain: one or more people and text

डाँ.आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आपले संपूर्ण जीवन देशबांधवांसाठी अर्पण केले. असा महान युगपुरुष भारत देशात जन्माला हे आपले भाग्य आहे ! बाबासाहेबांचे मानवतावादी, परिवर्तनवादी विचार आजही संपुर्ण जगात गौरवले जात आहेत.जगातील अनेक विद्वान या तत्वज्ञानाचा अभ्यास करीत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचे बाबासाहेब खरे वारसदार ठरले. भारत देशातील गरीब,दलित, उपेक्षित लोक तथाकथित उच्च वर्णीयांच्या पायाखाली चिरडले जात असताना मनुवादी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भिमराव आंबेडकर या सुर्याचा जन्म झाला. आंबेडकरांच्या ज्ञानाचे तेज पाहून सनातनी वैदिक लोकांच्या विषमतावादी, अन्यायी प्रवृत्तीला सुरुंग लागला आणि खर्या अर्थाने दलित अदिवासी उपेक्षित समाज स्वतंत्र झाला !
महामानव आंबेडकर यांचे कार्य पाहून तत्कालीन ब्रिटिश शासन ही अचंबित झाले होते आणि त्यांनी डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना त्यांच्या हक्काचे स्थान दिले !
आंबेडकर यांनी स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेतले , अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या.

'डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान आणि अभ्यास'
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र इत्यादी विषयाचे अध्ययन केले, त्यात प्राविण्य मिळवले. १९१५ मध्ये "प्राचीन भारताचा व्यापार" या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. ही पदवी संपादन केली. तसेच १९१६ मध्ये त्यांनी "National Divident of India: A historical and analytical study" या प्रबंधाबद्दल त्यांना कोलंबिया विद्यापीठाने Ph. D. ही पदवी प्रदान केली या प्रबंधाची मांडणी, संशोधन आणि चिकित्सक दृष्टीची अर्थशास्त्रातील विद्वानांनी मुक्तकंठाने स्तुती केली. संपूर्ण अमेरिकेत त्यांचे नाव गाजले. म्हणजेच "प्राचीन भारताचा व्यापार" आणि "National Divident of India: A historical and analytical study" हे दोन्हीही प्रबंध आंबेडकरांनी केवळ भारत देश समोर ठेऊन आणि त्याचे अर्थशास्त्रीय संशोधन करून त्यांची मांडणी केली होती हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे प्राचीन आणि तत्कालीन भारताचा अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास डॉ आंबेडकर यांनी केलेला होता. पुढे डॉ आंबेडकर यांनी अर्थशास्त्र मध्ये आणखी संशोधन करण्याची व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रीय पदाची पदवी संपादन करण्याची महत्वकांक्षा, ठेवली.
१९२१ मध्ये "Problem of Rupee" हा प्रबंध त्यांनी "London School of Economics " मध्ये मांडला. त्यांना D.Sc. हि पदवी संपादन केली.
आजही जेव्हा आपण जगातील प्रतिष्ठीत असलेल्या या विद्यापीठात पाऊल ठेवतो तेव्हा प्रवेशद्वारावर डाँ.भिमराव रामजी आंबेडकर यांची भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेते. भारताच्या या सुपुत्राच्या प्रतिमे खाली "Symbol of Knowledge" असे लिहून ठेवलेले आहे. संपुर्ण जग आंबेडकरांना ज्ञानाचे प्रतिक मानते. जगातील या महान विद्यापिठाला डॉ.आंबेडकर यांच्यासारखे विद्यार्थी लाभले याचा अभिमान आहे.

'भारत देशातील सामाजिक सुधारणा'
भारत देश उच्चवर्णियांच्या गुलामगिरीत असताना त्यांच्या या वर्चस्ववादाला आव्हान देत, अहिंसक प्रयत्नांनी डॉ आंबेडकर यांनी शोषित , उपेक्षित भारतीय लोकांना न्याय , हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले ! ते देखील कायदेशीर मार्गाने ! त्यात त्यांना यश मिळत गेले आणि भारत देश लोकशाहीप्रधान देशांच्या रांगेत जाऊ लागला.
आंबेडकर यांनी शिक्षण व समाजकल्याणासाठी आयुष्य घालवले. म्हणजे खर्या अर्थाने त्यागाची मूर्ति महामानव आंबेडकर आहेत ! त्यांच्या या महान कार्यास कोटि कोटि प्रणाम !

- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.