Type Here to Get Search Results !

लखनौ ते लाहोर १९४७



धर्म हा प्रदर्शनासाठी नसून आचरणासाठी असतो. जगात मानवता हाच खरा धर्म आहे.
 अनेकदा धर्माच्या नावाखाली माणूस देशाच्या सीमा आखून देईल....विभागणीही होईल पण अथांग पसरलेले आकाश तो कसे विभागेल  ....अविरत वाहणारा वारा कसा आडवून धरेल ....वाहत्या नदीला कसा थांबवेल....उडणार्या पक्षाची दिशा कसा बदलेल....!
धर्म माणसातला माणूस जागा करण्याची प्रक्रीया आहे. धर्म माणसाच्या हृदयात असला पाहीजे डोक्यात नाही. अनेकदा धर्माची व्याख्या चुकीच्या पद्धतीने  ठसवली जाते. धर्माचा अहंकार माणूस तोडण्याची प्रक्रीया आहे. जगताला कोणताही धर्म माणसाला हिसां शिकवत नाही. खरा धार्मिक माणूस अहिंसेचा पुजारी असतो. तो माणसावर प्रेम करतो.
अशा प्रगल्भ विचारांनी भारावून टाकणारे लखनौ ते लाहोर १९४७ हे नाटक पाहण्यात आले आणि डोक्यात विचांराचे थैमान सुरु झाले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वृदांने सादर केलेले हे दोन अंकी नाटक सर्वांग सुंदर आहे.
 मातृभुमीची धर्माने केलेली वाटणी आणि त्यातून निर्वासीतांना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना लेखकाने अतिशय प्रगल्भ होऊन टिपल्या आहेत. आपली मातृभूमी देश सोडून नव्या जागेत नव्या देशात मुस्लीम कुटुंबाची होणारी घुसमट आणि आपले घर न सोडता त्या घरातच शेवटचा श्वास जावा यासाठी हिंदू वृद्धेची चाललेली धडपड मनाचा ठाव घेते.
माणूस हा केंद्रबिंदू मानत धर्म हा माणसासाठी असतो धर्मासाठी माणूस नसतो हा मानवतावादी विचार देण्याचे शिवधनूष्य लेखकाने फारच संयमाने पेलले आहे. धर्म हा विषय अतिसंवेदनशील असतो आणि त्यावर भाष्य करताना त्यात आसलेला आशय आणि संवाद  हाच या नाटकाचा आत्मा आहे.
सुरवातीपासून या नाटकातील कलाकार प्रेक्षकांना आपलेसे करून घेतात. जसे जसे नाटक पुढे सरकत जाते तसा तसा धर्म हा माणसाच्या हृदयात जात माणूसकीचे कप्पे उलगडत जातो.
सहज पण तितकाच ताकदीने केलेला सुंदर अभिनय, साजेशे संगीत, नेपथ्य आणि कमालीची सुंदर कथा या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत.
माणूस हा भावनांचा कल्लौळ असणारा प्राणी आहे. हृद्यायातून ओसांडणारे प्रेम तो रोखू शकत नाही. खरा धर्म हा अशा माणसांच्या प्रेमाने बहरुन येतो...फुलतो,..आणि माणसाला माणसाजवळ घेऊन जातो. शुद्ध ...निथळ....माणूसपणाची गोष्ट सांगणारे  व जाणीव करुन देणारे *लखनौ ते लाहोर* हे नाटक म्हणूनच आजच्या काळात दिशादर्शक ठरते.
या नाटकातील कलाकार प्रणाली निमजे मैडम यांच्यामूळेच हे नाटक पाहण्याचा योग आला.मी त्यांचा मनपुर्वक आभारी आहे. नाटकातील सर्वच कलाकारांचे अभिनंदन ...!

 -  बिपीन जगताप
 Deputy chief exucutive officer
ww
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. काल जे काेणी नाटक पाहण्यासाठी आले नाहीत ते चांगल्या कलाकृतीला मुकले आहेत. कालच्या सारखा क्शण त्यांच्या आयुष्यात कधी येइल देव जाणे.

    उत्तर द्याहटवा