हो मला 'मुलगा' बनायचे आहे ?
ज्यावेळी मुलगी झाल्याचा आनंद समाजमान्य नव्हता त्यावेळी बीड जिल्ह्यातील साळवे कुंटूबांत ललीता जन्माला आली. 'मुलगी' या शब्दाने ललीताचे आयुष्य सुरु झाले.
![]() |
ललित आणि डॉ. मधुकर गायकवाड आणि मनोज पाटील |
' ती' लहानपणापासूनच खऱ्या अर्थाने घुसमटीचं जीवन जगत होती.
मुलींची कोणतेही शारीरीक व मानसिक लक्षणे ललीतामध्ये उठून दिसत नसली तरी सवयीने ललिता मुलगी म्हणून वावरत होती मात्र पुरुषी आवाजामुळे
मैत्रींणीशी,लोकांशी बोलताना तीला प्रचंड लाज वाटत असे. निसर्गाने आपल्यावर केलेल्या या अन्यायाची तीला प्रचंड चिड निर्माण झाली. आपल्यामध्ये असलेल्या पुरुषाची मात्र तिला सतत जाणीव होऊ लागली.
माणसांच्या जीवनात अनेक संघर्ष येतात. जगातल्या कुठल्याही शक्ती बरोबर माणूस लढतो आणि अनेकदा तो विजयी देखील होतो पण ललीताचा हा संघर्ष जगावेगळा होता. ललीताला आपल्यातला पुरुष बाहेर काढायचा होता. मुलीच्या पेहरावात वावरणारा मुलगा म्हणून त्याला स्वतंत्र ओळख द्यायची होती. शिवाय या सगळ्याला समाजमान्यताही मिळवायची होती. अस भल मोठ स्वप्न घेऊन ललीता जीवन कंठत होती शिक्षण पुर्ण करीत होती.
ललीता बारावी पास झाली जिद्द, चिकाटी आणि संघर्ष जन्मजात होताच ती आता स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करु लागली निर्धाराने पोलीस भरती झाली.
एका बाजूने अर्थिक परीस्थीती सुधारत असताना आता आपली खरी ओळख जगासमोर येण्यासाठी ललीताने मनात जिद्द आणि संघर्षाची मशाल पेटवली. ललीताचा ललीत होण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. शारीरिक गुंतागुंतीच्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा शोध घेतल्यावर आपल्या शरीरात पुरुषांचे हार्मोन्स जास्त असल्याचे समजले आणि ललीताने लिंगबदलाचा निर्णय घेतला आपल्या कुंटुंबातील सदस्यांना हा निर्णय निर्धाराने समजावून सांगितला..!
ललीताची झालेली घुसमट,पुसलेली ओळख,संपलेली उमेद, हरवलेला आत्मविश्वास, आणि होत असलेली कुंचबना कायमची थांबवायची होती. स्वातंत्र्याचा सुर्य उगवण्यासाठी ही काळरात्र संपवण्यासाठी कुंटूबांनेही ललीताला साथ दिली.
![]() |
बिहारीची उषाकुमारी ललित बरोबर सेल्फी घेताना |
ललीताला वीस दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सात ते आठ तास शस्त्रक्रिया सुरु होती डाँ.गायकवाड आणि डाँ. रजत कपूर यांच्या प्रयत्नांना यश आले लिंग बदलाची शस्त्रक्रिया यशस्वी पुर्ण झाली.
ललीताचा .... ललीत झाला. स्वप्न पुर्ण झाले. समाजाला घाबरुन घुसमटीचे जिवन जगणारी ललीता आज आत्मविश्वासाने जगापुढे ललीत म्हणून आला.
काल सेंट जार्जेस रुग्णालयात परममित्र डाँ.मधुकर गायकवाड सर यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी तिथे बिहारवरुन उषा कुमारी आली होती. तीलाही मुलगा बनायचे आहे ललीताचे युट्युबवरील व्हीडीओ बघून तीलाही प्रेरणा मिळाली आहे.
जगावेगळे काम करणारांचा नेहमीच सन्मान होतो आज ललीत ने वेगळे स्वातंत्र्य मिळवले आहे. त्याच्या फक्त व्यक्त होण्याने देशातील जवळपास तेरा जणांना प्रेरणा मिळाली आहे. आपणही हे घुसमटीचे जीवन सोडून आत्मविश्वासपुर्ण जीवन जगले पाहीजे या ध्यासाने हे सगळेजण झपाटले आहेत.
अतिशय गरीब घरातील वडील आणि भाऊ मरण पावलेले मजूरी करुन जिवन जगणारी उषा कुमारी बिहारपासून एकटी मुंबईत आलेली आहे. मुलीच्या शरीरातून तीलाही बाहेर पडायचे आहे.
योगायोगाने काल माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला ललीत सेंट जार्जेस रुग्णालयमध्ये तपासणीसाठी आला होता. डाँ.गायकवाड सरांनी ललीत ला बोलावले त्याला पाहताच उषा कुमारीचा आनंद गगणात मावत नव्हता. आपला प्रेरणास्त्रोत पाहून उषा कुमारी भारावून गेली होती.
बीड च्या ललीता साळवे यांचा ललीत साळवे बनण्याचा हा प्रवास आपण कल्पना करु शकणार नाही असाच आहे.त्याला प्रचंड मोठी संघर्षाची किनार आहे.
समाज मान्यता आणि सन्मानपूर्वक जीवन तसेच आपली खरी ओळख मिळण्याचा आनंद ललीतच्या चेहऱ्यावर उठून दिसत आहे.
ललितच्या या नव्या आयुष्याला खुप शुभेच्छा आणि धाडसाला सलाम ..!