Type Here to Get Search Results !

गोष्ट एका जिद्दीची...!

आजही प्रचंड संकटाचा सामना करताना ती हार पत्करत नाही....जगण्याची लढाई लढताना ती कधीही दमत नाही.
दोन्ही पायांनी संपुर्णत: अपंग असूनही ती आपल्याला जगण्याचं बळ देते. धडधाकट असणाऱ्या प्रत्येकाला ती जगण्याचं मर्म शिकवते. जगात रक्ताचं असं तीचं कोणीच नाही तरीही प्रत्येकाला ती आपलं मानते.
ही कहाणी आहे वसई च्या जेनी फर्नाडिसची..!
आठ महिन्याची असताना तापाने फणफणली...एकुलत्या एका लेकीला आई वडिलांनी डाँक्टरकडे नेली.. आणि यावेळी डाँक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनने दोन्ही पाय निकामी झाले. या प्रसंगाने तीच्या पालकांवर आभाळ कोसळले .....आणि मग जेनी च्या आयुष्यात सुरु झाली संकटाची मालीका....!
 सहा वर्षाच्या 'जेनी'ला आई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घेऊन गेली पण संपुर्ण अपंगत्व असल्याने शाळेने प्रवेश नाकारला पण यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. जेनीला शिकवायचे या जिद्दीने पेटलेल्या तीच्या आईने अखंड परिश्रम घेत तीला अकरावी पर्यंत शिकवले...तीला पाठिंबा दिला..आणि अचानक प्रचंड मोठे संकट घोंघावत आले...मोठा अपघात झाला आणि या अपघातात आई हे जग सोडून गेली.
सगंळ जग असताना जेनी एकटी पडली.मायेपासून दुरावली... एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर ही जाता येत नव्हते...आई वीना ती अपंग असतानाच आता ती पोरकी ही झाली. डोळ्यातील अश्रू पुसुन तीने जिद्दीने लढण्याची तयारी सुरु केली.आईची जागा वडिलांनी घेतली. जेनीला ते आईची माया देऊ लागले मदत करु लागले पण आई नसल्याने  शाळा सुटली...इच्छा असूनही तीला शिक्षण घेता आले नाही.
 नियतीने अजून प्रचंड मोठे संकट तीच्या आयुष्यात आणले. रेल्वे अपघातात वडीलांचा मृत्यू झाला.यावेळी जेनीच्य दुःखाला पारावर राहीला नाही. ती एकटी पडली.घरातील आई वडिलांचा हार घातलेला फोटो बघून तीच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते.
रक्ताची नाती असणारी माणंस तीला आश्रमात जाण्याचा सल्ला देऊ लागले. एकटी कशी जगणार ? तुला चालता येत नाही तुला कोण सांभाळेल ? अशी सगळी सांगू लागली.
पण आपल्या आई वडिलांच घर न सोडण्याचा निर्णय तीने घेतला.पाय नसले म्हणून काय झाले मन, मेंदू मनगट तर आहे ना..! ज्यांना हात न

सतात ते सुद्धा चित्र काढतात ना,..दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली लोक ट्रेनने बिनदिक्तपणे प्रवास करतात ना... या सगळ्यांपासून तीने प्रेरणा घेतली..नियतील हरवण्यासाठी अपंग मुलगी मैदानात उतरली. जिद्दीने पेटली.
हस्तकलेचे प्रशिक्षण घेतले. हातात कला होतीच त्याला परिश्रमाची साथ दिली. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा तीने सकारात्मक विचारांनी हस्तकलेत प्राविण्य प्राप्त केले आहे. जिवंत वाटावी अशी कागदापासून ती अप्रतिम फुल बनवते. महिलांना लागणारी आभुषणे बनवते.पायात नसलेले बळ तीने हातात आणले... या तीच्या जिद्दीला चिकाटीला शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाने बळ दिले.. आर्थिक मदत करुन तीला तीच्या पायावर उभा करण्याचा  प्रयत्न केला आहे. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत आयोजित प्रशिक्षणात ती शिक्षिका आहे. शेकडो महिलांना तीने प्रशिक्षण दिले आहे.अबला महिलांना सबला करण्याचा तीचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आज 'जेनी' ने महिलांना काम दिले आहे. महिन्याला किमान तीस चाळीस हजार रुपये कमावते आहे. तीला भविष्यात ही कला जगभर घेऊन जायाची आहे. चार चाकी गाडी घ्यायची आहे आणि खुप शिकायचे आहे.
जेनी म्हणते "अपंग ते असतात जे धडधाकट असूनही काहीच करीत नाहीत.ज्यांना पाय आहेत मात्र दुसऱ्यावर विसंबून असतात ते खरे अपंग आहेत".
 आयुष्य म्हणजे खरं तर जगण्याची लढाईच या लढाईत काहीजण हार पत्करुन जीवन संपवतात आत्महत्या करतात मात्र जेनी फर्नाडिंस सारखी माणसं जगण्याचं नव बळ देतात कायम तेजस्वी समईसारखं अधाराला पळवून लावतात.... समोरच्या प्रत्येकाला सात्त्विक आनंद आणि प्रेरणा देतात. जेनी तुझ्या भविष्यासाठी मनपुर्वक हार्दीक शुभेच्छा ...तुझ्या जगण्याच्या लढाईला सलाम...!
- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.