बाप माणूस म्हणजे घरा'चा कर्ता धर्ता.....बाप असला तर घराला घरपण आहे. आई वर अनेक कथा कविता आहेत पण बापवार मात्र फारस बोलले जात नाही. आज पुरुष दिन आहे. पुरूषबाबत आपल्या मनात अनेक गोष्टी असतात. पुरुष म्हटले की त्याला सहज रडता येत नाही कारण तो हळवा नसतो.
पुरुषांच्या बाबत समाजात अनेक मत मतांतर आहेत. पुरूषांना एक वेगळ्या नजरेने पाहण्यात येते. पुरुष प्रधान संस्कृती मध्ये पुरुष म्हणेल तसे होते हा समज आता गैरलागू आहे. मोठ्या प्रमानात महिला शिकल्या त्यांची प्रगती झाली. त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना होऊ लागली पण तरीही आज अनेक महिलांच्या बाबतीत विशेत्त्वाने ग्रामीण भागातील महिलांवर अन्याय अत्याचार होत असतात तसे अनेकदा दिसून येते.
शहरातील स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिकल्या त्या नोकरी करू लागल्या स्त्री पुरुष समानता आली पण काही प्रमाणात पुरुषांवर अन्याय सुरू झाले. अनेक कायदे महिलांच्या सुरक्षतेसाठी तयार केले आहेत पण त्यांचा गैरफायदा घेणार्या अनेक महिला आपल्या आजूबाजूला दिसतात. काही ठिकाणी तर बायकोच्या त्रासला अन्यायाला कंटाळून पुरुषांनी संघटना देखील केल्या आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी महिला आणि पुरुषांनी एक असणे आवश्यक आहे. संसाराच्या रथाची दोन चाके समान चालू असतील तरच संसाररथ यशस्वीपने पुढे जाऊ शकतो त्यामुळे सदृढ आरोग्यदायी समाजासाठी स्त्री पुरुष समानता अत्यंत आवश्यक आहे. आपल्या भारत देशात अनेक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असल्याचे पाहवयास मिळते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समवेत सावित्रीबाई फुले कायम उभ्या होत्या त्यामुळे सत्यशोधक समाजाची वाटचाल यशस्वी होऊ शकली.
आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी पुरुषांनी समाजासाठी केलेल्या सकारात्मक योगदानाचा सन्मान केला जातो आणि त्यांचे आरोग्य, ताणतणाव आणि समानतेवर लक्ष केंद्रित केले जाते.
इतिहास
• १९९९ साली डॉ. जेरोम टीलुकसिंग यांनी ट्रिनिडाड आणि टोबॅगो येथे या दिवसाची सुरुवात केली.
• त्यांनी आपल्या वडिलांच्या जन्मदिवसाला महत्त्व देत आणि पुरुषांसमोरील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही तारीख निवडली.
पुरुषांच्या समस्या आज आपणास दिसत नसल्या तरी त्या असतात यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. समाजातील कुटुंबातील अनेक समस्या उघडपणे पुरूषांना बोलता येत नाही. त्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जात आहे.
या दिवसाचे उद्दिष्टे
1. पुरुषांचे सकारात्मक आदर्श दाखवणे: विविध क्षेत्रांतील पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करणे.
2. पुरुषांच्या समस्या मांडणे: मानसिक आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती, आणि सामाजिक अपेक्षा यावर
चर्चा करणे.
3. लैंगिक समानतेस प्रोत्साहन देणे: स्त्री-पुरुषांमधील चांगले संबंध वाढवणे.
4. पुरुषांविरुद्ध होणारा भेदभाव थांबवणे: जसे की लिंगभेद, कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय.
5. सर्वांसाठी सुरक्षित समाज तयार करणे: आरोग्यपूर्ण संबंधांचे महत्त्व समजावणे.
यासाठी खलील प्रमाणे आपण उपक्रम राबवू शकतो.
सामान्य उपक्रम
• पुरुषांच्या आरोग्य, शिक्षण आणि ताणतणावावर चर्चासत्रे.
• मानसिक आरोग्य आणि आत्महत्येच्या प्रतिबंधाबाबत जागरूकता मोहिमा.
• स्थानिक पातळीवर व समाजात पुरुषांच्या यशाचा सन्मान.